“वायसीएम’मध्ये एसीला आग

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात सिटी स्कॅन मशीनच्या विभागात एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 15) पाचच्या सुमारास घडली.

या घटनेत फक्त एसीने पेट घेतल्याने तो जळून खाक झाला. इतर कोणतीही हानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सिटी स्कॅन मशीनमध्ये तपासणी केली जात होती. अचानक पाच वाजण्याच्या सुमारास एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली.

त्याचवेळी मशीनमध्ये रुग्णाला तपासणीसाठी ठेवण्यात येत होते. मशीन चालविणाऱ्या तज्ज्ञांच्या प्रसंगावधानतेमुळे तात्काळ पेशंटला तेथून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तेथील अग्निशमन साहित्याच्या सहाय्याने एसीला लागलेली आग तातडीने विझविण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)