‘वायसीएम’मध्ये आता मानसोपचार विभाग

पिंपरी – जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) नव्याने मानसोपचार विभाग सुरु करण्यात आला आहे. या विभागाचे उद्‌घाटन महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश देशमुख, रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव, मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. स्मिता पानसे, आरोग्य विभागाचे डॉ. पवन साळवे, पद्माकर पंडीत आदी उपस्थित होते.

-Ads-

महापौर जाधव म्हणाले, शहरातील मानसोपचार रुग्णांवर इतर रुग्णालयात उपचार केले जात होते. यामुळे, रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र, मानसिक रुग्णांसाठी वायसीएम रुग्णालयात नव्याने विभाग सुरु झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच, महापालिकेतर्फे रुग्णांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, शहरातील महापालिकेची बहुतांशी रुग्णालये सोई-सुविधेने सुसज्ज केली जाणार आहेत. महापालिकेच्या रुग्णांना वेळेत व आवश्‍यक सुविधा देण्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न केले जात आहेत. तसेच, रुग्णांनीही महापालिकेच्या रुग्णालयातील सुविधेचा लाभ घेण्याची गरज आहे.

डॉ. जाधव म्हणाले, वायसीएम रुग्णालयात मानसोपचार रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, या रुग्णांसाठी विशेष विभाग तयार करण्यात आलेला नव्हता. वायसीएममध्ये नव्याने सुरु केलेल्या विभागाने रुग्णांना पुण्यात अथवा इतरत्र न जाता शहरातच उपचाराची सोय होणार आहे. या रुग्णालयातील मानसोपचार विभागात सध्या 6 खाटा उपलब्ध असून हळूहळू 30 खाटांची क्षमता केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)