वायसीएममधील अपहारप्रकरणी चौघांची वेतनवाढ रोखली

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात झालेल्या 3 लाख 60 हजार 801 रुपये रक्कमेच्या अपहारप्रकरणी संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आणखी एका उपलेखापालासह 4 कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणा व गैरवर्तनाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, चौघांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5जणांवर कारवाई झाली आहे.

कारवाई झालेल्याची नावे उपलेखापाल बबलू भिमराव तेलंगी, मुख्य लिपिक काळुराम पांडुरंग बवले, लिपिक सुरज विश्‍वनाथ पाटकर आणि लिपिक इस्माईल अहमदमियॉ शेख अशी नावे आहेत. रुग्णालयाच्या कॅश काउंटरमध्ये कार्यरत असलेल्या बाळू मारुती भांगे या कर्मचाऱ्याने हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टिममध्ये फेरफार करून लाखो रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण पुढे आले होते. त्यामध्ये तथ्य आढळल्यानंतर भांगे याचे 23 नोव्हेंबर 2015ला निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली. प्राथमिक तपासणीत किती रक्कमेचा अपहार झाला, याची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत रोख घोटाळ्यात तब्बल 3 लाख 60 हजार 801 रुपयांचा अपहार झाल्याचे सिध्द झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अपहारातील एकूण 3 लाख 60 हजार 801 रुपये बाळू भांगे यांच्याकडून वसूल करण्यात आले आहेत. त्यानंतर भांगे याची खातेनिहाय चौकशी सुरू होती. या प्रकरणाची संपुर्ण चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यात आणखी 4 जणांना दोषी धरण्यात आले आहे. त्यामध्ये उपलेखापाल तेलंगी, मुख्य लिपिक बवले, लिपिक पाटकर व शेख यांचा समावेश आहे.

या चौघांचे गैरवर्तन, हलगर्जीपणा, निष्काळजीपणामुळे बाळू भांगे हा अपहार करू शकला, असा ठपका ठेवत या चौघांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)