वायसीएम’च्या वैद्यकीय अधिक्षकांना सक्‍त ताकीद

पिंपरी – लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडीत बालिकेवर योग्य उपचार न करता तिला ससून रूग्णालयात पाठविण्याबाबत निष्काळजीपणा करणारे महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच भविष्यात कर्तव्यपालनात कसूर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी ताकीद महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

चिंचवड – बिजलीनगर येथील एका चार वर्षाच्या बालिकेवर 2 ऑक्‍टोबर 2018 रोजी लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. पीडित बालिकेला वायसीएम रूग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, बालिकेवर प्राथमिक उपचार करण्याऐवजी तेथील डॉ. तुषार राजपूत यांनी वरिष्ठ अधिकारी म्हणून डॉ. मनोज देशमुख यांना संपूर्ण घटनेविषयी दुरध्वनीवरून कळविले. बालिकेचे लैंगिक शोषण झाले असतानाही तिच्यावर योग्य उपचार न करता तिला ससून रूग्णालयात पाठविले आणि उपचारात निष्काळजीपणा केला.

-Ads-

याप्रकरणात निष्काळजीपणा झाल्याबद्दल डॉ. देशमुख यांची चौकशी करण्यासाठी 6 ऑक्‍टोबर रोजी द्विसदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने डॉ. देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता सुचना दिल्याचे आढळून येत नसल्याबाबत अहवालात नमूद केले. डॉ. देशमुख यांनी पीडित मुलीस प्राथमिक उपचार करून ससून रूग्णालयात पाठविले किंवा नाही याबाबत खातरजमा किंवा चौकशी केल्याचे सकृतदर्शनी आढळून येत नसल्याने 19 ऑक्‍टोबर रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

त्यावर डॉ. देशमुख यांनी खुलासा केला. त्यामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात रूग्णास योग्य पद्धतीने हाताळणारी यंत्रणा वायसीएम रूग्णालयात उपलब्ध नाही. तसेच पीडित बालिकेला मानसिक व शारीरिक उपचाराची गरज असल्याने ससून रूग्णालयात पाठविण्याबाबत सुचना केली. याशिवाय न्यायवैद्यक शास्त्र विभाग वायसीएम रूग्णालयात नसल्याने अशी प्रकरणे प्राथमिक उपचारानंतर ससून रूग्णालयात पाठविण्याचे आदेश आहेत, असे त्यांनी खुलाशात नमुद केले. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित जबाबदार डॉ. तुषार राजपूत यांना सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी डॉ. देशमुख यांना सक्त समज दिली आहे. तसेच भविष्यात कर्तव्यपालनात कसूर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी ताकीदही दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)