“वायसीएम’च्या डागडुजीसाठी 32 कोटी

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरु आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्‍यक कामे करणे, नवजात अर्भक विभागाचे, डॉक्‍टरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी 32 कोटी तीन लाख 85 हजार रुपये खर्च येणार आहे. हे काम ठेकेदार एस. एस. साठे यांच्याकडून करुन घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात डॉक्‍टरांची कमतरता असते. ही कमतरता कमी करण्यासाठी कायम स्वरुपी उपाय म्हणून वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयासाठी विविध 43 पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये औषध वैद्यक, स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र, कान, नाक, घसा, अस्थिरोग, बालरोग, जनरल सर्जरी, रेडिओलॉजी, मानसोपचार, भूलशास्त्र, पॅथोलॉजी, उरोरोग शास्त्र या विषयांसाठी प्रत्येकी एक प्राध्यापक असणार आहे. तर, विविध विषयांचे 26 सहयोगी प्राध्यापक देखील नेमले जातील. तसेच, कोडींग क्‍लार्क, ऍक्‍युपेशनल थेरीपेस्ट, डॉक्‍युमेंटलिस्ट, स्टॅंस्टिशियन कम असिस्टंट प्रोफेसर, प्रोथेस्टिक ऍण्ड आर्थोटीक टेक्रीशियन, कॅंटालॉगर या पदावरही प्रत्येक एक जण भरती केला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पदव्युत्तर अभ्यासाक्रमासाठी आवश्‍यक कामे करणे, नवजात अर्भक विभागाचे, डॉक्‍टरांचे निवास्थानाचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. निविदेची रक्कम 30 कोटी 47 लाख 53 हजार 224 रुपये निविदेची रक्कम होती. त्यासाठी ठेकेदार एस. एस. साठे यांची 30 कोटी 66 लाख 71 हजार 616 रुपयांपेक्षा 4.50 टक्के जादा दराची निविदा प्राप्त झाली. एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा योग्य दरापेक्षा 9.81 ने टक्के कमी येत आहे. त्यामुळे मंजूर दरानेच म्हणजेच 31 कोटी 84 लाख 67 हजार 119 रुपयांची प्राप्त निविदा स्वीकारण्यात आली. रॉयल्टी चार्जेस, मटेरियल टेस्टींग चार्जेस असे दोन कोटी वाढीव रकमेस एकूण 32 कोटी तीन लाख 85 हजार 510 रुपयांमध्ये हे काम करुन घेण्यात येणार आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)