वायरमनला मारहाण ; पिता-पुत्रावर गुन्हा

पिंपरी – वीज खांबाच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या वायरमन आणि त्याच्या सहकाऱ्यांना रस्त्याने जाणाऱ्या पितापुत्राने मारहाण केली. यामुळे वायरमनने पितापुत्रावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 27) सकाळी साडेदहाच्या सुमारास हिंजवडी माण सार्वजनिक रोडवर घडला.

नानासाहेब पंडित जेवे (वय-39, रा. मथुरा कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार साहेबराव कुंडलिक ओझरकर आणि महेश साहेबराव ओझरकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी माण सार्वजनिक रोडवर विजेचा खांब खाली पडला. त्यामुळे खांबावरील तारा खाली पडल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या तारांचे दुरुस्तीचे काम नानासाहेब आणि वरिष्ठ वायरमन नथू पवळे, तानाजी काकनाळे हे तिघेजण करीत होते. काम सुरु असताना ओझरकर पिता-पुत्र दुचाकीवरून जात होते. ते जात असलेल्या रस्त्यावर तारा पडलेल्या होत्या. त्यामुळे नानासाहेब यांनी ओझरकर यांना पुढे तारा पडल्या असून पुढे जाऊ नका असे सांगितले. तरीही दोघेजण पुढे गेले आणि त्यांना तारा लागल्या. यावरून दोघांनी नानासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)