वायएसआर कॉंग्रेसचे सर्व खासदार देणार राजीनामे

अमरावती – आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून त्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष वायएसआर कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा कायम आहे. ही मागणी मोदी सरकारने मान्य न केल्यास संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त होताच पक्षाचे सर्व 9 खासदार राजीनामा देणार आहेत.

वायएसआर कॉंग्रेसचे अध्यक्ष वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनी आज पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत खासदारांच्या राजीनाम्याविषयीचा निर्णय घेण्यात आला. संसदेचे अधिवेशन 6 एप्रिलला समाप्त होणार आहे. याआधी वायएसआर कॉंग्रेसने खासदारांच्या राजीनाम्यासाठी तो दिवस निश्‍चित केला होता. मात्र, संसदेचे अधिवेशन मुदतीआधीच गुंडाळले जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. यापार्श्‍वभूमीवर, वायएसआर कॉंग्रेसने आजचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारवर दबाव टाकण्याबरोबरच आंध्रातील सत्तारूढ तेलगू देसम पक्षाची (टीडीपी) कोंडी करण्याचीही वायएसआर कॉंग्रेसची रणनीती आहे. टीडीपीच्या खासदारांनीही राजीनामे द्यावेत, असे आव्हान वायएसआर कॉंग्रेसने दिले आहे.

आंध्रला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी टीडीपी याआधीच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडला. या दोन्ही पक्षांनी मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्‍वास ठराव मांडण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)