वाम, बोंबिल, रहू, कतलाचे भाव घटले

श्रावण महिन्यामुळे मासळीला मागणी नसल्याचा परिणाम
चिकनही स्वत : इंग्लिश अंड्याचे भाव मात्र वाढले

प्रभात वृत्तसेवा

पुणे, दि. 13- पश्‍चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक सुरू झाली आहे. मात्र, श्रावण सुरू असल्यामुळे मासळीला फारशी मागणी नाही. त्यामुळे वाम, बोंबिल, रहू आणि कतलाच्या भावात कमालीची घट झाली आहे. उर्वरित मासळीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी ठाकुर परदेशी यांनी दिली.

मटण आणि चिकनला मागणी कमी आहे. तरीही मटणाचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. चिकनच्या भावात मात्र किलोमागे 10 रुपयांनी घट झाली आहे. अंड्याला मात्र मागणी वाढली आहे. त्यामुळे इंग्लिश अंड्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत शेकड्यामागे 33 रुपयांनी वाढ झाली आहे. गावरान अंड्याचे भाव मात्र स्थिर आहेत.

रविवारी गणेश पेठ येथील घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळीची सुमारे 3 ते 4 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 किलो आणि नदीतील मासळीची सुमारे 400 किलो इतकी आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू कतला आणि सिलनची मिळून सुमारे 4-5 टन आवक झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मासळीचे भाव पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो) ः पापलेट ः कापरी ः 1300, मोठे ः 900, मध्यम ः 700, लहान ः 600, भिला ः 450, हलवा ः 400-550, सुरमई ः 400-500, रावस लहान ः 550, मोठा ः 650, घोळ ः 480, करली ः 240, करंदी ( सोललेली ) ः 240, भिंग ः 280, पाला : 900-1400, वाम ः 200-480, ओले बोंबील ः 60-120.

कोळंबी ः लहान : 120-240, मोठी : 360-440, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स ः 650, लॉबस्टर ः 1400, मोरी : 160-240, मांदेली : 100, राणीमासा : 200, खेकडे : 200, चिंबोर्या : 440. खाडीची मासळी ः सौंदाळे ः 200, खापी ः 200, नगली ः 160-520, तांबोशी ः 440, पालू ः 200, लेपा ः 120-240, शेवटे : 180, बांगडा :100-180, पेडवी ः 60, बेळुंजी ः 100, तिसर्या : 160, खुबे : 120, तारली : 120

नदीची मासळी ः रहू ः 120, कतला ः 160, मरळ ः 320, शिवडा : 160, चिलापी : 40-60, मांगूर : 120, खवली : 160-180, आम्ळी ः 60-80, खेकडे ः 160, वाम ः 360-400.

मटण : बोकडाचे : 440, बोल्हाईचे ः 440, खिमा ः 440, कलेजी : 480.

चिकन : चिकन : 120, लेगपीस : 150, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 220.

अंडी : गावरान : शेकडा : 550, डझन : 72 प्रति नग : 6. इंग्लिश : शेकडा : 375डझन : 54 प्रतिनग : 4.50.
—————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)