वानवडी रंगले फुटबॉल सामने

कोंढवा- “राईट टू प्ले’ मोहिमेंतर्गत वानवडी येथील मोतिलाल मथुरवाला क्रीडांगणावर गुरुवारी 16 व 14 वर्षाखालील मुला-मुलींचे फुटबॉल सामन्यांचे नियोजन करण्यात आले होते. जवळपास 150 मुला-मुलांनी फुटबॉल खेळाचा आंनद लुटला. तेरे देस होम्स जर्मनीचे डॉ. फ्रेंक गार्बर्स, हीनर्क वोसुर्फ तसेच सी. जे. जॉर्ज, संपत मांडवे, मनिष श्रॉफ, संतोष जाधव उपस्थित होते. समाजातील वंचित मुलांना खेळण्याचा अधिकार मिळण्यासाठी “तेरे देस होम्स्‌’ विविध संस्थांच्या पुढाकारातून “राईट टू प्ले’ मोहीम राबवत आहे.

निर्माण, न्यू व्हिजन, इंडीया स्पॉन्सरशिप कमिटी या संस्था स्थलांतरीत मुले, कष्टकरी-कामगारांची मुले, बांधकाम मजुरांची मुले यांना इतर हक्कांसोबातच खेळण्याचा हक्क मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापूर्वी “राईट टू प्ले’ मोहिमेंतर्गत 17 सप्टेंबर 2017 रोजी वानवडी येथे क्रीडा उत्सवाचे आयोजन केले होते. त्यानंतर ऑल इंडिया युथ फुटबॉल अकादमीचे विवेक नागूल व त्यांचे प्रशिक्षक सहकारी यांच्या परिपूर्ण मार्गदर्शनाखाली जवळपास 150 मुलांचा नियमित सराव घेतला जातो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)