पुणे-  वानवडी पोलिसांनी सराईत गुन्हेगारास पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून घरफोडी तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

हरजितसिंग सिपालसिंग टाक (28, रा. तुळजापूर रोड) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 40.060 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख 30 हजार व एक सॅट्रो कार असा ऐवज हस्तगत करण्यात आला.

वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार निसार खान व पोलीस शिपाई नासीर देशमुख यांना सराईत गुन्हेगार हरजितसिंग हा गोसावी वस्ती येथील कॅनॉलवर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार सापळा रचण्यात आला होता. मात्र, पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला होता. पोलिसांनी त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याने वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोडी, मार्केटयार्ड 1 वाहन चोरी, कोंढवा 1 घरफोडी अशा 4 घरफोडी व एक वाहनचोरीचा 2 लाख 35 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तो वानवडी, हडपसर, भोसरी, खडकी, विश्रामबाग, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरी, जबरी चोरी व घरफोडीमधील दाखल गुन्ह्यांमधील वॉंटेड आरोपी आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सयाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय म्हेत्रे, पोलीस कर्मचारी रमेश भोसले, सुदर्शन बोरावके, नामदेव चव्हाण, योगेश गायकवाड, कानीफनाथ कारखेले, शिरीष गोसावी, प्रतिक लाहीगुडे, सागर नवले यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)