वाद सोडवणाऱ्या भावांवरच चाकू हल्ला

– चौघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात

पिंपरी – गल्लीतून वेगात गाडी चालवण्यावरुन सुरु असलेले भांडण सोडवण्यास गेलेल्या तीन भावांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता थेरगाव येथे घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रकरणी वाकड पोलिसांनी अनिकेत हरिषचंद्र काळे, रवींद्र जगदीश पोखरकर, हृषीकेश हरेराम पांचाळ, आदेश दिलीप बालवडकर यांना अटक केली आहे. तर एक अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात प्रितम जयरवींद्र अडसूळ (वय-24), प्रेम जयरवींद्र अडसूळ (वय-27), संदीप अडसूळ व केरबा मगर हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप उभा असताना आदेश हा त्याच्या समोरुन एकदम वेगात गाडी चालवत गेला. यावेळी संदीपने त्याच्या जवळच उभ्या असलेल्या अनिकेतला त्याबद्दल आदेशला समजवण्यास सांगितले. अनिकेत याने आदेशला बोलवून समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता संदीप याच्याशी भांडण सुरु केले.
आपल्या भावा सोबत सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी प्रेम व प्रितम त्याठिकाणी आले. अनिकेत व आदेश यांनी त्यांना मारहाण करत गळा दाबून चाकूने वार केले. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या केरबालाही दुखापत झाली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)