वादापेक्षा संमेलन महत्त्वाचे

पुणे – यवतमाळमध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे राज्यासहित विदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. गेल्या काही काळात संमेलनांना जाणीवपूर्वक कोणत्या न कोणत्या वादात गोवून अपयशी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, मराठी भाषा आणि वाचक यांच्या दृष्टीने वादापेक्षा साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. त्यामुळेच अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ सर्वसामान्य वाचकांसाठी या संमेलनात सहभागी होणार आहे, अशी भूमिका प्रकाशक संघातर्फे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी स्पष्ट केली आहे.

बर्वे म्हणाले, “साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यंदा डॉ. अरुणा ढेरे यांची सन्मानपूर्वक निवड झाली आहे. संमेलनाच्या 92 वर्षांच्या कालावधीत डॉ. ढेरे या चौथ्या महिला अध्यक्षा आहेत. इतकेच नव्हे तर “वाचकांच्या मनातला अध्यक्ष’ अशी प्रतिक्रिया माध्यमांबरोबरच अनेक साहित्यप्रेमींनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच आता ही सर्व साहित्यप्रेमींची नैतिक जबाबदारी आहे, की त्यांनी संमेलनाबाबत होणारे वाद बाजूला सारून संमेलनात मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावावी. तसेच, हे संमेलन यशस्वी करून आम्हाला वादापेक्षा वाचनात रस आहे, हे सिद्ध कारावे.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सहित्य संमेलानावर बहिष्कार टाकण्याबाबत साहित्यक्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमट आहेत. आयोजकांनी लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रित करून ऐनवेळी त्यांचे निमंत्रण रद्द करणे ही अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. याचा विरोध झालाच पाहिजे. मात्र, त्यासाठी सरसकट संमेलनावर बहिष्कार घालण्याऐवजी संमेलनात येऊन साहित्यिकांनी आपला विरोध व्यक्त करावा अशा प्रतिक्रिया मराठी भाषा आणि साहित्यप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देहलूरकर, डॉ. प्र. के. घाणेकर, द. मा. मिरासदार, सुधीर गाडगीळ, डॉ. स्नेहलता देशमुख, दिलीप माजगावकर यांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)