वादात असतानाही मिथुनपुत्राचा विवाह 

बलात्कार, बलजबरीने गर्भपात आणि धमक्‍यांच्या आरोपांमुळे मिथुनपुत्र महाअक्षय उर्फ मिमोहचा विवाह ऐनवेळी अडचणीत आला होता. मात्र त्याही परिस्थितीत मिमोहचा विवाह लावून देण्यात मिथुनदा यशस्वी झाले आहेत. मंगळवारी अगदी वाजत गाजत मिमोहचा विवाह मिमोह विवाहबद्ध झाला. हा विवाह 7 जुलै रोजी होणार असे ठरले होते. त्याच दिवशी पोलिस उटीतल्या हॉटेलवर येऊन थडकले आणि वधूसह सर्व वऱ्हाड विवाहस्थळ सोडून निघून गेले. त्यामुळे विवाहाचे सर्व सोपसार बाकी राहिले होते. या विवाहाचे रजिस्ट्रेशन तर शनिवारी झाले होते. पण लग्नाचे विधी बाकी होते,ते मंगळवारी पूर्ण करण्यात आले, असे स्पष्टिकरण देण्यात आले आहे.

एका भोजपुरी अभिनेत्रीने मिमोहवर बलात्कार, बळजबरीने ऍबॉर्शन आणि धमक्‍या देण्याचा आरोप केला होता. त्यामुळे मिमोहविरोधात एफआयआरपण दाखल झाली आहे. या ऍक्‍ट्रेसला मिमोहची आई योगिता बालीनेही धमकावल्याचा आरोप आहे. एवढ्या सगळ्या घडामोडींचा मिमोहची नववधू मदालसावर आणि तिच्या पालकांवर जराही परिणाम झाला नाही. या सगळ्यात काय तथ्य आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे विचलित होण्याचे अजिबात कारण नाही, असे मदालसाच्या आई आणि अभिनेत्री शीला शर्मा यांनी म्हटले आहे. धार्मिक रितीरिवाजांप्रमाणे झालेल्या विवाह सोहळ्यावरही या आपत्तीचे कोणतेही सावट नव्हते. मिमोह आणि मदालसा दोघेही अगदी आनंदात दिसत होते. त्यांनी अगदी उत्साहाने विवाहाचे सोपस्कार पार पाडले. अर्थात या विवाह समारंभाला निकटचे नातेवाईक काही निवडक मित्र यांच्याव्यतिरिक्‍त कोणीही उपस्थित नव्हते. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तर या विवाह समारंभाच्या जवळपासही फिरकू शकले नाहीत.

मिमोहने बॉलिवूडमहील काही सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र त्याच्या करिअरचा ग्राफ काही खास उंचावलेला नाही. तर मदालसा हिंदीपेक्षा दक्षिणेतील सिनेमांमध्येच जास्त ऍक्‍टिव्ह असते. मिथुनला एक मुलगी आणि दोन मुले आहेत. मिमोहचे बॉलिवूडमध्ये उतरण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी झाले नसले तरी त्याला बंगाली आणि भोजपुरी सिनेमांमध्ये नशिब आजमावणे अजून सुरू आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)