वादांमध्ये अडकलेल्या इंटर मिलान क्‍लबमध्ये बदल घडणार ?

मिलान: इंटर मिलान संघाचे नवे मुख्य अधिकारी म्हणून गिउसेप मरोटा यांनी पद स्वीकारले आहे. याअगोदर ते जुवेंटस संघासह मुख्याधिकारी होते. त्यांच्या काळात मागील आठ वर्षात सात वेळा जुवेंटसने सिरी ए ( इटालियन लीग)चे विजेतेपद पटकाविले होते. 2010 मध्ये इंटर मिलान संघाने चॅम्पियन लीग, इटालियन कप आणि सिरी ए चे विजेतेपदे पटकावून ट्रीबल पूर्ण केले होते. त्या सुवर्ण कामगिरीच्या आसपास इंटर मिलान संघाला घेऊन जाण्याचे आव्हान मरोटा यांच्यासमोर असणार आहे.

नापोली विरुद्धच्या महत्वपूर्ण सामान्याच्या अगोदर संघातील मुख्य खेळाडू रादजा निंगगोलानला संघाच्या शिस्तीचे पालन न केल्याने काही काळासाठी बडतर्फ केले आहे. संघाने तुलनेने कमकुवत संघ चिवो संघाविरुद्ध सामना 1-1 असा बरोबर सडवल्यानंतर पहाटेच्या सराव सत्रास वेळेत हजेरी न लावल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)