वादग्रस्त सीमाभागात पाकिस्तान-अफगाणिस्तान सैनिकांमध्ये चकमकी

काबूल (अफगाणिस्तान)-अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सैनिकांमध्ये वादग्रस्त सीमाभागात चकमकी झाल्याची माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली आहे. पूर्व अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी सीमा ओलांडू अफगाणिस्तानच्या प्रदेशात प्रवेश केल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या प्रदेशात घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी अफगाण सैन्याने प्रतिहल्ला केला. दोन्ही सैन्यातील चकमकी चालूच असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये 2400 किलोमीटर्स लांबीची सीमा आहे. 1896 साली ब्रिटिशांनी ही 2400 किमी लांबीची ड्युरॅंड़ लाईन ही सीमा आखलेली आहे. ती पार करून पाकिस्तानी सैनिक अफगाण हद्दीत घुसल्याची माहिती प्रभारी प्रांतीय पोलीस प्रमुख कर्नल अब्दुल यांनी दिली आहे. आज सकाळी सुरू झालेल्या या चकमकी चालूच असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या चकमकींत झालेल्या प्राणहानीबाबत त्यांनी काही सांगण्यास नकार दिला ब्रिटिशांनी 1896 साली घालून दिलेली ड्युरॅंड लाईन ही आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचे काबूलला मान्य नाही. आणि सीमाभागात पाकिस्तान करत असलेल्या नवीन तटबंदीला काबूलचा विरोध आहे अफगणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील खिंडारे असलेल्या या सीमाभागातून दहशतवाद्यांच्या चाललेल्या कारवायांबाबत दोन्ही देश परस्परांना दोष देत असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)