वादग्रस्त विषय आणि अप्रत्यक्ष वाद टाळण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली – दीर्घकाळापासूनची अनेक उद्दिष्टे गाठण्याच्या बेतात आपला देश असताना वादग्रस्त विषय आणि अप्रत्यक्ष वाद टाळण्याचे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना केले आहे. 72 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला देशवासियांना उद्देशून टिव्हीवरून केलेल्या भाषणामध्ये त्यांनी हे आवाहन केले. आपल्या भाषणामध्ये राष्ट्रपतींनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या शिकवणूकीचा पुनरुच्चार केला. अहिंसेचे सामर्थ्य हे हिंसेपेक्षा कितीतरी अधिक असते, असे ते म्हणाले. देशात अलिकडच्या काळात घडलेल्या सामूहिक हिंसेच्या घटनांच्या पार्श्‍वभुमीवर त्यांचे हे वक्‍तव्य विशेष महत्वाचे आहे.

आपल्या संदेशामध्ये राष्ट्रपतींनी अनेक विषयांचा उहापोह केला. महिलांना त्यांच्या आवडीनुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे. महिलांच्या खासगी आयुष्य आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्‍त करतानाच त्यांच्या क्षमतांचे संवर्धन करण्याचे आवाहनही राष्ट्रपतींनी केले. सध्या आपला देश आपल्या बहुप्रतिक्षित उद्दिष्टांच्या जवळ पोहोचला आहे. सर्वत्र विद्युतीकरण, खुल्यावरील शौच प्रथेचा अंत, बेघरांना घरे उपलब्ध करणे, दारित्र्य निर्मूलन ही उद्दिष्ट्ये साध्य केली जात आहेत. या काळात वादग्रस्त विषय आणि अप्रत्यक्ष वादांमूळे विचलित होता कामा नये, असे राष्ट्रपती म्हणाले. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नियमांचे पालन करणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा मान राखते. आपल्या देशात बदल आणि प्रगतीचा वेग प्रचंड वाढला आहे. या वेगामध्ये नागरिकांनी भारतीयत्वाचा विचार मनातमध्ये कायम ठेवून सरकारच्या बरोबरीने सहभागी व्हायला हवे.

-Ads-

देशातील महिलांच्या विकासाच्या मुद्दयावर राष्ट्रपतींनी विशेष भर दिला. देशातील महिलांच्या प्रगतीच्या विस्तारातच देशाच्या स्वातंत्र्याचा विस्तार सामावलेला आहे. देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्यासाठी आपले कर्तव्य निष्ठे आणि प्रामाणिकपणे पार पाडणे हे प्रत्येक देशवासियाचे कर्तव्य आहे.

या वर्षी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षाला प्रारंभ होतो आहे. महात्मा गांधी हे देशाचे प्रेरणास्थान आहेत. ते स्वदेशीबाबत बोलत असत. कवाडे खुली ठेवणे ही भारतीय संस्कृती आहे, असे ते म्हणत असत. अर्थकारण, आरोग्य, शिक्षण, सामाजिक आकांक्षा याबाबत महात्मा गांधीचे हेच विचार आजही अनुसरणीय आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले.
शिक्षणाचा अर्थ केवळ पदवी किंवा पदविका नाही, तर दुसऱ्याच्या जीवनमानामध्ये स्थायी प्रगती आणण्यासाठीची बांधिलकी आहे. सहानुभूती आणि बंधुता हेच भारतीयत्वाचे तत्व आहे. कारण भारतीयत्व हे भारतातील नागरिकांशी संबंधित आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)