वातावरण बदलामुळे “स्वाइन फ्लू’ वाढण्याची भीती

2 हजार 700 व्यक्‍तींची तपासणी : 68 व्यक्‍तींना दिल्या “टॅमीफ्लू’

पुणे – शहरातील उन्हाचा कडाका वाढल्यामुळे मागील आठ दिवसांपासून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव काहीस कमी झाला होता. मात्र, हवामानातील बदल, ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती आहे. त्यामुळे नागरिकांनी या हवामानात बाहेर पडताना खबदरदारी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्‍टरांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मंगळवारी (दि. 6) दिवसभरात 2 हजार 700 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तीन व्यक्तींना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आहे. तर 68 संशयीत व्यक्तींना टॅमीफ्लू औषधे देऊन घरी सोडण्यात आले.

मागील दोन दिवसांपासून शहरात अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून, दिवसा ढगाळ आणि रात्री थंडी असे हवामान अनुभवायला मिळत आहे. मात्र, हे हवामान आरोग्यासाठी हानीकारक असून, त्यामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना नाका-तोंडाला रुमाल किंवा मास्क लावूनच बाहेर पडावे. सर्दी, घसा, खोकला आणि ताप ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्‍टरांकडे जावून तपासणी करून घ्यावी.

दरम्यान, मागील 10 महिन्यात 571 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यामध्ये काही रुग्णांना प्राणही गमवावे लागले आहे. मंगळवारी दिवसभरात केलेल्या तपासणीमध्ये 3 व्यक्तींना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले. सद्य परिस्थितीत शहरातील विविध रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 12 आहे. तर पुणे जिल्ह्यात दोन महिन्यांत 8 व्यक्‍तींचा मृत्यू झाला असून, शंभरहून अधिक जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)