वातावरणामधील बदलामुळे घसादुखी

मागील दोन महिन्यांपासून थंड वारे वाहत होते आणि शहरात गारवा निर्माण झाला होता. शहरातील लोकांनी हिवाळा ऋतूमधील थंडीचा अनुभव घेतला. उत्सवी सीझन संपून भारतीय नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि शहरातील तापमानामध्ये बदल झाला आहे. शहरातील तापमान अस्थिर बनले आहे म्हणजेच कधी थंडी असते, तर कधी गरम होते.

मुख्यत: रात्री व पहाटेच्या वेळी 21 से. पासून 34 से. पर्यंत तापमानात सतत होत असलेल्या बदलामुळे अनेक पुणेकरांना फ्लू आजार होत आहे. या आजाराने पीडित बहुतेक लोकांनी त्यांच्या डॉक्‍टरकडे घसा दुखत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. विविध वयोगटातील 15 ते 20 टक्के पुणेकर या आजाराने ग्रस्त आहेत. विशेषत: शाळेत जाणारी मुले व तान्ह्या बालकांमध्ये हा त्रास आढळून आला आहे.

या आजारामध्ये ऍलर्जी-हीनिटीस (नाक गळणे, ताप, शिंकणे व डोळ्यांतून पाणी येणे) आणि व्हायरल फैरिंजायटिस (गिळताना त्रास होणे, सर्दी व खोकला) या ऍलर्जी दिसून येतात. दुखत असलेल्या घशाबाबत उपचार करण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे

सकाळच्या वेळी चालणे टाळता येऊ शकते : सकाळच्या वेळी मुख्यत: सकाळी 5 वाजता हवेमध्ये धूळ व दव पडण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे सकाळच्या वेळेचे चालणे टाळणे हेच योग्य आहे. सकाळी 6.30 किंवा 7 वाजता चालायला जाऊ शकता.

ऍन्टिबायोटिक्‍स घेणे टाळा : अंग खूप गरम झाले असेल किंवा व्यक्तीला श्‍वास घेण्यामध्ये त्रास होत असेल आणि खूप ताप आला असेल तर ऍन्टिबायोटिक्‍स औषधे घेऊ नयेत. अशा स्थितीत योग्य उपचारासाठी डॉक्‍टरकडे जा. स्वत:हून औषधे घेऊ नका.

वेळेवर औषधे घ्या : डॉक्‍टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळेवर औषधे घेण्याची काळजी घ्या. आजार बरा झाला आहे, असे समजून औषधाचा कोर्स पूर्ण करणे टाळू नका. औषधाचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जंक फूड टाळा : जंक फूड, तळलेले पदार्थ व शीतपेये यांचे सेवन करणे टाळावे.
घरगुती उपचार : घरगुती कोणतेच उपचार नाहीत. पण, दिवसभरात तुलसी किंवा आल्याचा चहा, मीठाचे पाणी व दिवसातून वारंवार गरम पाणी पिणे हे देखील उपयुक्त ठरू शकते.

योग्य आहाराचे सेवन करा
आजाराच्या काळात सामान्यत: रोगप्रतिकार शक्ती कमी असते. पौष्टिक आहाराचे सेवन करा. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पाण्यात थोडेसे मध टाकून पाणी प्या. यामुळे फुप्फुसांमध्ये असलेल्या म्युकासविरुद्ध लढण्यास मदत होईल. ठरावीक कालावधीमध्ये आरोग्यदायी आहार घ्या आणि बाहेरील पदार्थ खाणे टाळा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)