वातावरणातील बदलामुळे लाल मिरचीचा दर्जा घसरला

गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याने उत्पादनात घट


परिणामी मिरचीच्या भावात वाढ सुरूच आहे

पुणे – वातावरणात सातत होणाऱ्या बदलामुळे आंध्र प्रदेश येथील लाल मिरचीचा दर्जा खालावला आहे. तरीही उत्पन्नात घट झाल्यामुळे भावामध्ये मात्र वाढच होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात सुमारे पन्नास ते साठ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. भावात आतापर्यंत सुमारे 30 ते 40 टक्क्‌यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकाच्या खिशाला झळ बसत आहे. 1 जुलै 2017 पासून शासनाने वस्तू आणि सेवा कर लागू केल्यामुळे बाहेरील राज्यातून गुलटेकडी येथील मार्केटयार्डात होणारी आवक घटली आहे. आवक, दर्जा घसरल्याने मागणी नेहमीच्या तुलनेत घटली असल्याचे मिरचीचे व्यापारी आणि दि पुना मर्चंटस चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुगळे यांनी सांगितले.
नवीन मिरचीची आवक डिसेंबर महिन्यापासून सुरु झाली असून ती एप्रिल अखेरपर्यंत सुरु राहील. दरवर्षी भारतातून बांगलादेश, चीन, श्रीलंका आदी देशांमध्ये निर्यात केली जाते. मात्र यंदा उत्पादन कमी असल्यामुळे
निर्यातही नगण्य होत आहे. यंदा जुना माल शीतगृहात 15 लाख पोती आहे. चालू वर्षातील 25 लाख पोती
शीतगृहात पाठविण्यात आली आहेत. दरवर्षी हाच साठा 60 ते 62 लाख पोती इतका असतो. मात्र यंदा अवघी 40 लाख पोती शीतगृहात आहेत. मार्केटयार्डातील भुसार विभागातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, आणि मध्यप्रदेश येथून आवक होते. मिरचीच्या हंगामात चार वेळा तोड केली जाते. पहिली तोडीचा माल हा साधारण
असतो. दुसऱ्या तोडीच्या मालापेक्षा चांगला असतो. तिसरी तोड साधारण असते. चौथी तोडीतील माल हलक्‍या दर्जाचे असतो. बाजारात आणखी आठ ते दहा दिवस चांगल्या प्रतिचे माल येतील. त्यानंतर हलक्‍या दर्जाच्या मालाची आवक होईल, असे मिरचीचे व्यापारी सोपान राख यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातून मिरचीची आवकच नाही
मध्य प्रदेश येथे मिरचीवर यावर्षी रोग पडला. त्यामुळे तेथे नेहमीच्या तुलनेत अवघे वीस टक्केच
उत्पादन झाले आहे. त्यामुळे तेथील मिरची पुणे मार्केटमध्ये विक्रीस आलीच नाही. तसेच महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा पावसाळ्याचा हंगाम लांबल्याने मिरचीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उत्पादन कमी निघाले आहे.

 

यावर्षी प्रमुख उत्पादक राज्यामध्ये मिरची उत्पादन घटले आहे. कमी उत्पादनामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत मिरचीचे भाव वाढतच आहेत. त्यातच केंद्र शासनाने 1 जुलै 2017 पासून
लागू केलेल्या जीएसटीचा परिणाम मिरचीच्या उलाढालीवर झाला आहे. व्यवहार करताना उत्पादक, खरेदीदार आणि व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत.
– राजेंद्र गुगळे
मिरची व्यापारी आणि माजी अध्यक्ष, दि पुना मर्चंटस चेंबर

मिरचीचे प्रतिकिलोच घाऊक बाजारातील भाव
मिरचीचा प्रकार -मार्च 2017 -मार्च 2018
तेजा मिरची -70 ते 80 रुपये -100 ते 110 रुपये
खुडवा मिरची -20 ते 30 रुपये -45 ते 55 रुपये
ब्याडगी मिरची -110 ते 130 रुपये -140 ते 160 रुपये
गंटुर मिरची -50 ते 65 रुपये -85 ते 100 रुपये


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)