वातावरणातील बदलामुळे बागायती शेतीला फटका

पवनानगर – गेल्या तीन ते चार दिवसांनपासून वातावरणातील सततच्या बदलामुळे बागायती शेतीला फटका बसला आहे. वाढत्या थंडीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

येळसे, शिवली, कोथुर्णे, काले, वारू या गावामध्ये बागयती क्षेत्र अधिक आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी फरशी, टोमॅटो, काकडी, ज्वारी पिकांची लागवड केली आहे. पण वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. शनिवारी (दि. 9) तापमान 6 अंशावर गेल्याने दवबिंदू ही गोठले होते. यामुळे फरसी, ज्वारी, टोमॅटो या पिकांना थंडीचा शॉक लागून पिकांची फुलगळती होऊन शेंडे आणि पाने करपून गेले आहे.

काकडी, बटाटा पावटा या पिकांवर माव्या रोगाचा प्रादूर्भाव झालेला आहे, तर वाढत्या थंडीमुळे ऊसाची ही वाढ खुंटली आहे. ज्वारी, फरसबी, टोमॅटो या पिकांची पाने करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कळवले आहे. कृषी विभागकडून याची तात्काळ दखल घेत मंडल काले विभागाच्या वतीने या पिकांची पाहणी करण्यात आली आहे

बदलत्या वातावरणामुळे टोमॅटो, ज्वारी, फरसी या पिकांची पाहणी करुन वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. लवकरच वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचनामे करण्यात येईल.
– एन. बी. साबळे, मंडल कृषी अधिकारी, काले कॉलनी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)