वाणी समाजाला राजकीय संरक्षण हवे – धनंजय मुंडे

पिंपरी – अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाला आरक्षण नाही तर राजकीय संरक्षण हवे आहे, असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. समाजातील मुलांच्या वसतीगृहासाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

लाडशाखीय वाणी समाजाच्या वतीने मुळशी तालुक्‍यातील मारुंजी येथे दोन दिवसीय अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या सत्राचा समारोप प्रसंगी मुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खा. राजू शेट्‌टी, अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी, स्वागताध्यक्ष आर. एन. वाणी, अनिल चितोडकर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. जगदीश चिंचोरे, सुनील भोकरे, जयंत वाणी, सुनील भामरे यांचा विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

-Ads-

मुंडे म्हणाले की, मराठी माणूस एकत्र येणे ही दुर्मिळ गोष्ट आहे, तर एकी टिकवणे फार कठीण काम असून वाणी समाजाने हे आव्हान पेलत सर्वांना पुन्हा एकत्र बांधले आहे. वाणी समाज काही मागण्या पेक्षा समाजाला काही देण्यासाठी पुढे असतो. त्यामुळेच हा समाज ज्या प्रदेशात, देशात जातो. तेथे एकरूप होऊन आपले कर्तव्य पार पाडत असतो. स्वतःचा विकास करतानाच इतरांना ही बरोबर घेऊन त्यांना अनेक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात वाणी समाज अग्रेसर आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाणी समाजाची संख्या अधिक आहे. या शहराच्या नव्हे तर देशाच्या जडण घडणीत समाजाचा मोठा वाटा आहे. पांडुरंग शास्त्री आठवले, प्रसाद महाराज, अंमळनेरचे महाराज, विचारदास महाराज यांचा अध्यात्माचा वारसा जपत, धार्मिक परंपरा जोपासत वाणी समाज प्रगल्भ होत गेला, असे मुंडे म्हणाले.
प्रास्ताविक कैलास वाणी यांनी केले.

सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर, समिरा गुजर यांनी केले. तर आभार आर. एल. वाणी यांनी मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)