वाणी समाजाचे मारुंजीत अधिवेशन

पिंपरी – लाडशाखीय वाणी समाज महासंघाच्या वतीने शनिवारी व रविवारी (दि. 24 व 25) मारुंजी येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला देशभरातून एैंशी हजारांहून जास्त सभासदांनी ऑनलाईन नोंदणी केली असून पन्नास हजारांहून जास्त समाज बांधव उपस्थित राहतील अशी माहिती महाअधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मारुंजी येथे शनिवारी (दि. 24) होणाऱ्या महाअधिवेशनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी पावणे एक वाजता होणार आहे. यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते होणार आहे.

मार्गदर्शन सत्रात ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर (समाज उभारणीत युवा वर्गाचा सहभाग), मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश (करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन), पर्सिस्टंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे (आय. टी.क्षेत्र काल, आज आणि उद्या), ज्येष्ठ उद्योजक सतीश मगर, संजीव बजाज, अनुज पुरी (बांधकाम व विपणन व्यवसाय भविष्यातील संधी), मनिष गुप्ता (यशस्वी उद्योजक, स्वप्न व वेळेचे नियोजन), संजय पाटील, किशोर मासुरकर, सुरेश जाधव (औषध क्षेत्रात संधी व विकास) मार्गदर्शन करणार आहेत. उद्योजकता संमेलनाचा समारोप माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.

रविवारी (दि. 25) सकाळच्या सत्रात प. पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे (समाजाचे संस्कार व एकीचे बळ), बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड (शेती व उद्योग व भविष्यातील संधी), भारतीय जैन संघटनेचे शांतीलालजी मुथा (एकीने समाजाचा विकास कसा साधाल) मार्गदर्शन करणार आहेत. महाअधिवेशनाचा समारोप दुपारी साडेचार वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाने होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)