वाढे फाटा मार्गावर खड्डयांचे साम्राज्य

सातारा – यंदाच्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे वाढे फाटा ते सदरबझार मार्गावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डयांमुळे वाहनधारक त्रस्त झाले असून खड्डे तात्काळ बुुजवून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी वाहनधारक करीत आहेत.

वाढे फाटा ते सातारा मार्गावर मोना स्कूलसमोरील या रस्त्यावर खड्डयांचे प्रमाण वाढले आहे. पावला पावलावर खोलवर खड्डे निर्माण झाल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी चालकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तर खड्डे चुकविताना येत्या काळात मोठा अपघात देखील घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ रस्ते दुरूस्त झाले तर संभाव्य अपघात टाळता येणार आहे.

..तर आम्ही खड्डे बुजविणार: काकडे
खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सोमवारी पालिका मुख्याधिकाऱ्यांना आम्ही भेटणार आहोत. त्यावेळी पालिका खड्डे बुजविणार आहे की नाही या प्रश्‍नाचे उत्तर घेवूनच तेथून बाहेर पडणार .पालिकेने टाळाटाळ केली तर भाजप स्वखर्चाने मुरूम टाकून खड्डे बुजविणार असल्याचे स्थानिक नगरसेवक मिलींद काकडे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)