वाढदिवसानिमित्त आदिवासी भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य भेट

कोतूळ – येथील मुंबई महानगरपालिकेत मानव संसाधन विभागात असलेले सागर प्रतापराव पोखरकर यांनी आपल्या अथर्व या मुलाचा पाचवा वाढदिवस आदिवासी भागातील केळी, ओतूर, बांगरवाडी, उंबरविहिरे प्राथमिक शाळेतील मुलांसमवेत साजरा केला. यावेळी त्यांनी 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रंग साहित्य आणि खाऊचे वाटप केले. पोखरकर यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय बोऱ्हाडे हे होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाष वायळ, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब खतोडे, मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे, नंदाताई पोखरकर, भामाबाई पोखरकर, सोनालीताई पोखरकर, राठोड ताई, अनुज पोखरकर, उपसरपंच नंदाताई शिरसाठ, हरिभाऊ वायळ, कुंडलिक भांगे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा भावनाथ, विठ्ठल वायळ, दिनकर वायळ, संदीप वायळ, तुषार बोऱ्हाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पं. स. सदस्य बोऱ्हाडे म्हणाले की, पोखरकर यांनी एक सामाजिक बांधिलकी जपली हे कौतुकास्पद आहे. याचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. कृ.उ.बा.स. संचालक वायळ म्हणाले की, वाढदिवसावर आपण भरमसाठ खर्च करत असतो. मात्र, ज्याला खरी गरज आहे अशांना या दिवशी मदत केली तर ती खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल.
सागर पोखरकर म्हणाले, “”आगामी काळातही मी दुर्गम भागातील मुलांसाठी मदत करणार असून, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मी व माझे मित्र प्रयत्न करू. मुलांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च करण्यापेक्षा ज्याला मदत करता येईल त्याला केली पाहिजे.” मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे यांनी प्रास्ताविक करत सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी केळी बांगरवाडी, उंबरविहिरे येथील मुलांनाही शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी दिलीप चौधरी, पोपट सोनवणे, बाळू जगधने, आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)