वाढदिवसाचा खर्च टाळून आरोग्य केंद्राला मदत

मंचर- समाजाच्या हिताच्या दृष्टीने काम केल्यास त्याचा आनंद मोठा असतो. निरगुडसर ग्रामस्थांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करुन त्यातुन जमा झालेल्या पैशातुन प्राथमिक आरोग्य केंद्राला विविध उपकरणे दिली आहेत. निरगुडसर ग्रामस्थांच्या उपक्रमाचे इतर गावांनी अनुकरण करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले.
दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निरगुडसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुमारे 1 लाख 35 हजार रुपये खर्च करुन मण व मानेतील गॅप दूर करण्यासाठी ट्रॅक्‍शन मशीन, हाडातील दुखणे दूर करण्यासाठी ऍन्टासॉनिक मशीन, शेक देण्यासाठी शॉर्ट डायथेनिक मशीन, ह्दय चिकित्सा मशीन इत्यादी आधुनिक उपकरणांचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, शिरुर पंचायतीचे सभापती विश्‍वास कोहकडे, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक नामदेव थोरात, खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान वाघ, भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकसहभागातुन अनेक उपक्रम सरकारच्या मदती शिवाय राबविता येतात. निरगुडसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातुन आधुनिक उपकरणे देवून रुग्णांना उत्तम सेवा देण्याचा ग्रामस्थांनी केलेला उपक्रम स्तुत्य आहे. वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमाचा डामडौल न करता खर्चात बचत करुन समाजाला मदत होईल असे उपक्रम ग्रामस्थांनी राबवले पाहिजेत, असे सांगून विवेक वळसे पाटील म्हणाले की, समाजाच्या हिताच्या दृष्टीने काम केल्यास त्याचा आनंद मोठा असतो. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने विविध उपकरणे दिल्याने आता रुग्णानां वैद्यकीय तपासणीसाठी दुरवर जावे लागणार नाही. प्रास्ताविक आणि स्वागत सरपंच उर्मिला वळसे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य सुनिल वळसे पाटील यांनी केले तर आभार उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)