वाढदिवशी सचिनच्या रॉजर फेडररला खास शुभेच्छा

शांत व संयमी स्वभावगुणांसाठी ओळखले जाणारे खेळाडू म्हणजे सचिन तेंडूलकर आणि रॉजर फेडरर. परंतु हेच शांत व संयमी खेळाडू मैदानात उतरल्यावर आपल्या आक्रमक शैलीने प्रतिस्पर्ध्याची दाणादाण उडवण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. जसे क्रिकेटविश्वात सचिनचे स्थान अजरामर आहे त्याचप्रमाणे टेनिसविश्वात रॉजर फेडररचे स्थान देखील अद्वितीय आहे.

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनने आपण टेनिसपटू रॉजर फेडररचे चाहते असल्याचे अनेक वेळा बोलून दाखवले आहे. सचिनने आपल्या आवडत्या टेनिसपटूला त्याच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ट्विटरद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत. फेडरर सोबतचा आपला फोटो शेअर करत सचिनने “एक चांगला माणूस आणि टेनिस इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी खेळाडू रॉजर फेडररला वाढदिवसाच्या शुभेच्छा” असा संदेश ट्विट केला आहे.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)