वाढत्या महागाईमुळे यंदा बाप्पाही महागणार

ओतूर- येथील कुंभारवाड्यात गणेश आगमनाची लगबग सुरू झाली आहे. श्रीगणेशाचे आगमन अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्याने सध्या शहरातील श्रींच्या मूर्ती बनविणाऱ्या कारखान्यांबरोबर कुंभारवाड्यांमध्ये मूर्तीची ऑर्डर देण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मूर्तिकारांनी मूर्ती तयार करणे, रंग देण्याच्या कामाला गती दिली आहे. वाढत्या महागाईने मूर्तीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरातही वाढ झाल्याने यंदा बाप्पाही महागणार आहेत.
श्रींच्या उत्सवाची चाहूल आतापासूनच लागल्यामुळे श्रींच्या स्वागताची जय्यत तयारीही सुरू झाली आहे. श्रींच्या मूर्ती बनविणाऱ्या छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये कलाकारांची धांदल उडाली आहे. जसजसा सण जवळ येऊ लागला, तसतसा कलाकार दिवसरात्र काम करताना पाहायला मिळत आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तिकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते तबल्यावरील, नागावरील, लालबागचा, मोरावरील, फेट्यामधील, पेशवाई, बालगणेश, सम्राट, पाटील, शेतकरी फेटा अशा रूपातील श्रींच्या मूर्ती बनविण्याच्या ऑर्डर्स देत आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बाप्पांचे आगमन होत आहे. भाविकांचा इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढला आहे. मात्र, यंदाही मूर्तिकारांनी महागाईचा मुद्दा घेत बाप्पांच्या मूर्ती कमळामध्ये, धनलक्ष्मीच्या रूपात बनविल्या आहेत. दरवर्षीपेक्षा यावेळी मूर्तीच्या दरात काहीशी वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. 100 रुपयांपासून ते बारा हजार रुपयांपर्यंत गणेशमूर्ती आहेत.6 इंचापासून ते 8 फुटांपर्यंत मूर्ती आहेत. मूर्तीवर डायमंड सजावट केलेली आहे.

  • मानाच्या गणपतींना मागणी अधिक
    कारखान्यांमध्ये वर्षभर काम सुरू असले तरी शेवटच्या क्षणी मात्र कलाकारांची धांदल उडते. गणेशभक्तांची आवडनिवड जोपासावी लागते. पावसाचे दिवस असल्याने रंग वाळत नाहीत. मागणी वाढत असते, वॉशिंग करून ठेवले जाते, त्यामुळे पाऊस जास्त असला तरी हॅलोजन बल्ब लावून रंग सुकवता येतो. आमच्याकडे 60 प्रकारच्या 700 मूर्ती आहेत. तुळशीबाग, मंडई, दगडूशेठ, कसबा पेठ, पेशवाई, सावकार, मोरावरचे, बालमूर्ती आणि मुंबईच्या लालबागचा राजा असे मानाचे गणपती आहेत. त्यांना मागणी वाढली आहे, असे ओतूर येथील आरती आर्टचे कलाकार संदीप जगताप, ज्योती जगताप, प्रसाद जगताप, आरती जगताप यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)