वाढत्या थंडीमुळे आरोग्यालाही “हुडहुडी’

पुणे – शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असल्यामुळे त्वचेच्या समस्यांसह दमा, सांधेदुखी, सर्दी, घसा दुखणे या समस्याही वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत, तत्काळ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे. दरम्यान, या समस्येत हवेच्या प्रदूषणाची भर पडली असून, त्यामुळे डोळे आणि श्‍वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांना नाका-तोंडाला रुमाल बांधावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून करण्यात आले आहे.

मागील दहा दिवसांपासून शहरातील थंडीचा पारा 8 अंशांच्या खाली गेला आहे. त्यामुळे हुडहुडी भरणाऱ्या या बोचऱ्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडणे, जखम असलेल्या त्वचा खराब होणे अशा समस्या वाढल्या आहेत. त्यातच डेंग्यू, चिकनगुणिया यासह सर्दी, खोकला, ताप येणे, घसा खबखवणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी लहान मुलांसह स्वत:ची काळजी घ्यावी. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू असून कर्वेरस्ता आणि पिंपरी-चिंचवड मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे या भागात हवेचे प्रदूषण वाढल्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. हेवेत धुलिकणांचे प्रमाण वाढल्यामुळे ते नाका, तोंडात जातात आणि घसा खवखवणे किंवा लाल होणे, नाक कोरडे पडणे, डोळ्यांची जळजळ अशा समस्या उद्‌भवत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

थंडीमध्ये कशापध्दतीने काळजी घ्यावी
थंडीमध्ये त्वचेच्या समस्या अधिक उद्‌भवतात. त्यामुळे कोरड्या त्वचेसाठी एखादी क्रीम वापरावी. थंड पाण्याने हात न धुता कोमट पाण्याने धुवावे. घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रुमाल किंवा मफलर बांधावा. सर्दी, खोकला, ताप असल्यास गरम पाणी प्यावे. अति थंड पाणी पिऊ नये. विशेषत: लहान मुलांच्या त्वचेकडे आणि त्यांच्या शारिरीक रचनेत होणाऱ्या बदलावर लक्ष ठेवून त्यांची काळजी घ्यावी.

थंडी आणि हवेतील प्रदूषणामुळे सर्दी-खोकला, दम लागणे अशा समस्या वाढल्या आहेत. हा खोकला बराच काळ राहातो. त्यामुळे कोमट पाण्याने गुळण्या करणे. जेवणात “क’ जीवनसत्त्व असलेले पदार्थ घ्यावेत. तसेच धुलीकणांमुळे डोळे, नाक आणि घस्याच्या समस्या उद्‌भवत असल्यामुळे नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य औषधोपचार घ्यावेत.
– डॉ. राजीव अंबड, फॅमिली फिजिशियन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)