वाढत्या तापमानाची ‘डोकेदुखी’

मुंबई – राज्यातील तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. पारा चाळीशीच्यावर गेला असून उष्माघाताने बळीही गेले आहेत. तसेच वाढत्या तापमानामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रासही वाढू लागला आहे.

गरमीमुळे शरीराच्या तापमानात वाढ होते. मेंदूला जास्त तापमान सहन होत नसल्याने मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास वाढतो.

सध्या राज्यात सर्वत्रच तापमान असल्याने मायग्रेनचा त्रास असणाऱ्या रुग्णांचा त्रास बळावतो. या काळात मायग्रेनचा त्रास वाढल्याने मळमळणे, उलट्या होणे या समस्याही निर्माण होतात.

हे अवश्‍य करा

डोकेदुखी टाळण्यासाठी योग्य वेळी आहार घ्या

उन्हात न फिरणे, तेलकट, तिखट पदार्थ खाणे टाळणे.

कलिंगड, लिंबूसरबत, फळांचे रस, उसाचे रस, दही,ताक असे द्रव्ययुक्त पदार्थाचा आहारात समावेश करावा.

डोकेदुखी सुरू झाल्यावर पेन किलर, पॅरासिटमोलच्या गोळ्या घेणे टाळा.

उन्हाळ्यात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. पण, यावर उपाय म्हणजे उन्हात जाताना डोके झाकावे, तणाव घेऊ नये, पाणी जास्त प्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)