वाढत्या उन्हामुळे ऊस करपणार?

संग्रहित छायाचित्र

इंदापुरातील स्थिती


नोंदी न झालेला ऊस घालविण्याकिरता शेतकऱ्यांची गडबड

निमसाखर- नीरा व भीमा नद्यांनी इंदापूर तालुका वेढलेला असल्याने तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर बागायत क्षेत्र आढळून येते. तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकरी ऊसाची लागवड करतात. यंदाही उसाचे क्षेत्र अतिरिक्‍त आहे. यामुळे कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतातील उसाला तोड यावी याकरिता शेतकरी प्रयत्न करीत आहेत. राजकीय नेत्यांच्या ओळखीपाळखीवर मर्जीतल्यांचे खोडवे, निडवे तोडून नेले. मात्र, काहींच्या ऊसाला नोंदीनुसार तोड आली नसल्याने गळीत हंगाम शेवटच्या टप्यात असतानाही सामान्य शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा असून आठवडभरात ऊस गेला नाही तर वाढत्या उन्हामुळे तो करपू लागेल.

कर्मयोगी, नीरा-भीमा, छत्रपती, हरणेश्‍वर, बारामती ऍग्रो यासह सोनाई गूळ प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यासह एकूण सहा कारखाने तालुक्‍यात आहेत. नीराभीमा, कर्मयोगी यासह बारामती ऍग्रोचा गळीत हंगाम उरकला आहे. त्यामुळे नोंदी न झालेला आहे तो ऊस अन्य कारखान्यांना देण्यासाठी शेकऱ्यांचे प्रयत्न आहेत. याकरिता गुऱ्हाळ मालकांशी शेतकऱ्यांची बोलणी सुरू झाली आहेत.

त्यानंतरही ऊस गेला नाही तर ऊसकांड्या सुकायला लागतील, त्यातच सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरीची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे उसाला पाणी कमी पडू लागले आहे. वाढत्या उन्हाबरोबरच अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे उसाचे पीक जगविताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. 15 महिन्यांत जाणारे उसाचे पीक 16व्या महिऱ्यांत शेतात उभे असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, इंदापूर तालुक्‍यात एकरी ऊस उत्पादन वाढ कार्यक्रम राबविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, “ह्योच ऊस जादा व्हतोय, उत्पादन वाढवून करायचं काय?’ असा सवाल शेतकरी आता करीत आहेत. इंदापूर तालुक्‍यातील काही गावांतील शेतकऱ्यांनी कमी दराने ऊस देऊन आपली शेतं मोकळी केली. पण, काहींच्या नोदीच झाल्या नाहीत तर काहींच्या उशीरा झाल्या यामुळे ऊस गेला नाही. आता यातून खासगी कारखाने व गुऱ्हाळे यांना ऊस देऊन रानं मोकळी करण्याकरिता शेतकरी प्रयत्न करीत आहेत.

ऊस नावालाच नगदी…
उसाला दीड ते दोन रुपयांपर्यंत पैस निघतात. तर वाळलेले सरपण पाच ते दहा रुपये किलोंपेक्षा अधिक दराने विकले जाते. जळणापेक्षाही कमी भावाने ऊस विकला जात आहे. रासायनिक खताची एक गोणी 600 ते 800 रुपयांना घेऊन उसाचे जतन करणाऱ्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर याच कारणामुळे वाढतो आहे. वीजबिल, पाणीपट्टी याचा विचार केला तर ऊस हे पीक आता नुसतेच नावाला नगदी राहीले असल्याची शेतकऱ्यांनी भावना तयार झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)