वाढत्या इंग्रजी शाळांमुळे झेडपीच्या शिक्षकांचे भवितव्य धोक्‍यात : शरद पवार

प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या शताब्दी महोत्सवास प्रारंभ

नगर: शिक्षणाचे सार्वत्रिकरण होतांना गुणवत्ता देखील महत्वाची झाली आहे. त्याकडे शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. आज ग्रामीण भागात इंग्रजी शाळा सुरू होत असून पालकांचा देखील जिल्हा परिषद शाळेपेक्षा या इंग्रजी शाळा ओढा वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांची संख्या रोडावत असून परिणामी पटसंख्या नसल्याने शिक्षक कमी होत आहे. ही जिल्हा परिषद शिक्षकांसाठी धोक्‍याची घंटा असून त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या शताब्दी महोत्सवाला प्रारंभ व जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ संकूलाचे भूमिपूजन कोनशीला अनावरण खा. पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आमदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पोपटराव पवार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, शिक्षणाचा विस्ताव व सार्वत्रिकरणासाठी यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले. इंग्रजी शाळांचे वाढते पेव पाहता जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचा धोका वाढला आहे. त्यामुळे पूर्ण शिक्षक देण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे. या शिक्षक संघटनेचे शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. आज समाज व सरकार शिक्षणांसाठी प्रयत्न करीत असतांना शिक्षकांनी देखील आपले कर्तव्य व्यवस्थित बजावले पाहिजे. शेवटच्या विद्यार्थ्यांला देखील घडविण्याची जबाबदारी शिक्षकांनी स्वीकारली पाहिजे. तर शिक्षकांवर समाजाचा विश्‍वास वाढले. प्राथमिक शिक्षक बॅंकेचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालू आहे. राज्यातील इतर संस्थांच्या तुलनेत बॅंकेचे काम कौतकास्पद आहे. संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याने संस्थेची प्रगती झाल्याचे खा. पवार म्हणाले.

यावेळी ना. शिंदे म्हणाले, बॅंकचे काम चांगले असून यापुढे देखील संचालकांनी चांगल्या पद्धतीने कामकाज करून बॅंकेचा नावलौकिक वाढवावा. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी प्रास्ताविकात बॅंकेची माहिती दिली. तसेच विकास मंडळाकडून उभारण्यात येणार व्यापारी संकूलाला 13 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ते काम 18 महिन्यात पूर्ण करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)