वाड्या-वस्त्यावरील रस्त्यांची दुरुस्ती

मंचर- आंबेगव तालुक्‍यातील कळंब येथील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या वाड्या-वस्त्यावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा येत होता. रस्त्यांची दुरुस्ती केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
रस्त्याच्या कामांच्या शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आशिष कानडे, भरत कानडे, अनिल काळे, राजकुमार साळवे, किशोर भालेराव, रोहिणी भालेराव समवेत विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. भैरवनाथ मळा, शिलमळा, गणेशवाडी, शिरामळा, माळीमळा, सुंभेमळा, ठाकरवाडी या ठिकाणी असणारे पाणंद रस्त्यांची कामे ग्रामपंचायतीने हाती घेतली आहेत. रस्त्याच्या कडेला असणारी झाडे-झुडपे तोडून रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला आहे. रस्त्यावर जागो-जागी खड्डे असल्यामुळे पावसाळ्यात येणे-जाणे मुश्‍कील झाले होते. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर मुरुम टाकण्याची मागणी केली होती. याकरिता ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन रस्त्यांवर मुरूम टाकून रस्ते खड्डेमुक्त केले आहेत.
15 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र तसेच वाडी-वस्तीवरील झाडे-झुडपे व परिसर स्वच्छ केला आहे. तसेच मच्छर उत्पती रोखून डेंग्यू आजार पसरू नये यासाठी औषध फवारणीचे कामे सुरु आहेत. शाळेच्या माध्यमातून गावात स्वच्छता प्रभातफेरी काढण्यात येत आहे, अशी माहिती सरपंच राजश्री भालेराव व उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)