वाडेबोल्हाई उपसरपंच पदाचा राजीनामा

वाघोली- वाडेबोल्हाई (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुरेखा शिवाजी भोरडे यांनी आज (दि. 9) मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला आहे. शासनाने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन भोरडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे यांना दिले. यावेळी माजी सरपंच कुशाबा गावडे, चंद्रकांत सातव, माजी उपसरपंच राजेश वारघडे, केसनंद ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव, दादा शिंदे, शिवाजी भोरडे, युवराज इंगळे आदी मान्यवर बहुसंखेने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)