वाड;मय पुरस्कारांमध्ये आता आदिवासी साहित्याचा समावेश

पुणे, शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवतराव चव्हाण राज्य वाड;मय पुरस्कारांमध्ये आता अदिवासी साहित्य पुरस्काराचा समावेश करण्यात येणार आहे.हा पुरस्कार डॉ.गोविंद गोरे यांच्या नावाने देण्यात येणार आहे.याबाबतची अधिसूचना नुकतीच राज्य शासनाने काढली आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने वर्षभरात साहित्य क्षेत्रात कामगिरी केलेल्या वाड;मय पुरस्कार दिले जातात.या पुरस्कारांचे वाटप दरवषी केले होते.विविध साहित्य प्रकारांमध्ये दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांमध्ये आदिवासी साहित्यांचा समावेश नव्हता.हा पुरस्कार दलित साहित्य प्रकारामध्ये दिला जायचा पण याबाबत लळित रंगभूमीचे संस्थापक कुंडलिक केदारी यांनी सतत पाठपुरावा करुन आदिवसी साहित्य पुरस्कार हा वेगळ देण्यात यावा अशी मागणी केली.याबाबत त्यांनी सांस्कृतिक मंत्रालयाला सुध्दा निवेदन दिले होते.सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना भेटून याबाबत माहिती दिली होती.अखेर राज्य शासनाने साहित्य क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये आदिवासी साहित्य पुरस्काराचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.पुढील वर्षी म्हणजे 2018 मध्ये होणाऱ्या पुरस्कारांमध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना केदारी म्हणाले, 2013 पासून मी याचा पाठपुरावा करत आहेत.अखेर चार वर्षांने न्याय मिळाला आहे.यामुळे आता दरवर्षी भारतीय साहित्य संमेलनात आदिवासी साहित्य आणि साहित्यिकांची नोंद घेतली जाईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)