वाडमयचौर्याबाबत यूजीसीच्या नवीन नियमांना मंजुरी

नवी दिल्ली – वाडमयचौर्याबाबत यूजीसीच्या नवीन नियमांना सरकारने मंजूरी दिली आहे. नवीन नियमांनुसार वाडमय चौर्य करणाऱ्या शिक्षकांची नोकरी जाणार असून विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द होऊ शकणार आहे. वाडमयचौर्याबाबत यूजीसी (युनिव्हर्सिटी ग्रॅंट्‌स कमिशन) तयार केलेल्या नवीन नियमांना केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने मंजूरी दिली आहे.

यूजीसी (उच्च शैक्षणिक्‍ संस्थांमधील शैक्षणिक सचोटी आणि वाडमयचौर्य प्रतिबंध प्रचार) नियम, 2018 ला या आठवड्यात आधिसूचित केला आहे. या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत यूजीसीने वाडमयचौऱ्याबद्दल श्रेणीबद्ध शिक्षेला मान्यता दिली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार वाड्‌मयचौर्य सिद्ध झालेल्या शिक्षकांची नोकरी जाऊ शकते, तर विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द होऊ शकते. आपल्या संशोधनात 10 टक्केपर्यंत वाड्‌मयचौर्य असल्यास काही कारवाई होणार नाही. 10 ते 40 टक्के पर्यंत वाड्‌मयचौर्य असेल तर विद्यार्थ्याला सुधारित शोधनिबंध सादर करावा लागेल. 40 ते 60 टक्के पर्यंत वाड्‌मय चौर्य असेल तर शोधनिबंध सादर करण्यास एका वर्षाची बंदी घालण्यात येईल आणि 60 टक्केपेक्षा अधिके वाडमय चौर्य असल्यास त्याची नोंदणी रद्द करण्यात येईल.

शैक्षाणिक आणि शोधनिबंधात 10ते 40 वाडमयचौर्य असेल तर शिक्षकांना शोधनिबंध परत घेण्यास सांगण्यात येईल, 40 ते 60 टक्के असेल तर त्यांना नवीन मास्टर्स, एमफिल आणि पीएचडी यांना दोन वर्षे मार्गदर्शन करण्यास बंदी घालण्यात येईल आणि त्यांची वार्षिक पगारवाढ रोखण्यात येईल. 60 टक्केपेक्षा अधिक वाडमयचर्य असल्यास फॅकल्टी मेंबर्स निलंबित करण्यात येतील वा बडतर्फ केले जातील

वाड्‌मयीन चोरीचा कोणाही सदस्यास संशय आला तर त्याने पुराव्यासह डीएआयपी कडे तक्रार नोंदवावी. डीएआयपी स्यूमोटो म्हणजे स्वत:हूनही कारवाई करू शकेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)