वाठार स्टेशन सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य करणार : विक्रम पावसकर

वाठार स्टेशन -वाठार स्टेशन विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्यांचा तसेच सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. या सोसायटीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले.

वाठार स्टेशन सोसायटीच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी, हिंदू एकता आंदोलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नुकताच ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनीही वाठार स्टेशन विकास सेवा सोसायटीस सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. विक्रम पावसकर यांचा सत्कार जेष्ठ नागरिक सुभाष नाना काळोखे यांच्यावतीने आला. मनोज कलापट, संचालक भरतशेठ लोंढे, रामभाऊ काळोखे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लोंढे तसेच वाठार स्टेशनचे ग्रामस्थ उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)