वाठार स्टेशन येथील रेल्वेसेवा सात तासानंतर सुरळीत

वाठार स्टेशन – वाठार स्टेशन येथील महाकाली मंदिराजवळ रेल्वे ब्रीज लगत रेल्वे इंजिन रविवारी रुळावरून खाली उतरले होते. त्यामध्ये इंजिनासह रेल्वे ट्रॅकचे नुकसान झाले होते. रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले.

लोहमार्ग सोडून खाली उतरलेले रेल्वेचे इंजिन रुळावर घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा फौजफाटा सोबत आणला होता. क्रेन व हायड्रॉलिक जॅकच्या सहाय्याने रेल्वेचे इंजिन हळूहळू सरकवत रुळावर घेतले. रात्रीची वेळ असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने चार ते-पाच जनरेटरची सोय केली होती. तसेच रेल्वे इंजिन रुळावर घेण्यासाठी आधुनिक पद्धतीची यंत्रसामग्री आणली होती. रेल्वे ट्रॅकही दुरुस्त करण्यात आला.

अथक परिश्रमानंतर तब्बल सात तासांनी रेल्वे लाईन सुरळीत झाली. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानंतर सातारा रेल्वे स्टेशन येथे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एक्‍सप्रेस गाड्या थांबवून ठेवल्या होत्या. त्या गाड्या रात्री -नंतर रेल्वे लाईन सुरळीत झाल्यानंतर सुरु केल्या. रेल्वे लाईन पूर्ववत सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्‍वास सोडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)