वाठार स्टेशनला अवकाळी पावसाने झोडपले

वाठार स्टेशन, दि. 6 (प्रतिनिधी) – कोरेगाव तालुक्‍यातील वाठार स्टेशन व तडवळे परिसरात आज सकाळी विजांचा कडकडाट जोरादार पाऊस झाला. सलग दोन तास एकसारखा पाऊस पडत होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी करून टाकले. वाठार स्टेशन व तडवळे परिसरातील शिवारात पाण्याचे लोटच्या लोट पाहावयास मिळाले. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतावरील ताली वाहून गेल्या. त्याचबरोबर शेतातील पिके ज्वारी, हरभरा, कांदा पाण्याबरोबर वाहून गेला. लहान लहान नालाबंडिंग भरून वाहू लागले. छोटे छोटे तलाव भरून वाहायला लागले. यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले. वाठार स्टेशन मध्ये रस्त्याच्या कडेला असणारी ग्रामपंचायतीची सांडपाण्याची गटारे तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर वाहू लागले. दुष्काळामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी या पावसामुळे गोड होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)