वाठार स्टेशनमध्ये कुटुंबावर हल्ला

एकजण गंभीर : शेतातील घेवडा तुडवल्याच्या कारणातून बेदम मारहाण

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – वाठार स्टेशन येथील एका कुटुंबावर शेजारीच राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांनी खुनी हल्ला चढवला. यामध्ये वाठार स्टेशन येथील शिक्षक प्रकाश कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही या आपल्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यात आलेली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश कांबळे हे भाडळे येथील रा. वि. ताराळकर या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळची शाळा असल्याने ते लवकर घरी आले होते. घरी आल्यानंतर ते त्यांच्या दुकानामध्ये शाळेचे लिखाणाचे काम करत होते. यावेळी सायंकाळी शेजारी राहणाऱ्या लक्ष्मी नारायण कांबळे या प्रकाश कांबळे यांच्या पत्नी सौ. उर्मिला यांना म्हणाल्या आमचा घेवडा का तुडवला, आमच्या विटा का घेवड्यात पाडल्या. यावर लक्ष्मी कांबळे आणि प्रकाश कांबळे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर प्रकाश कांबळे हे पुन्हा आपल्या चुलत भाऊ संतोष शामराव कांबळे यांच्या समवेत दुकानात बसले होते. अचानक रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सहा ते सात लोकांच्या जमावाने लाकडी दांडके, लोखंडी गज यांच्या साह्याने प्रकाश कांबळे, सौ. उर्मिला, चुलत भाऊ संतोष कांबळे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रकाश कांबळे यांच्या डोक्‍याला मार लागला. रक्तस्राव होऊ लागल्याने ते समोरील हॉस्पिटलमध्ये जात होते. यावेळीही जमावाने त्यांना मारहाण केली. हल्ल्यातील जखमी प्रकाश कांबळे, सौ. उर्मिला कांबळे व संतोष शामराव कांबळे यांना शनिवारी रात्री पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी अशोक नारायण कांबळे, लक्ष्मी नारायण कांबळे, संतोष नारायण कांबळे यांच्या पत्नी, सर्व रा. वाठार स्टेशन, महेश वर्पे रा. कापशी, तसेच एक अज्ञात यांच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तपास स.पो.नि. मारुती खेडकर, महिला कॉन्स्टेबल वैराट करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)