वाठार किरोली येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

file photo

रहिमतपूर- वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे नवचैतन्य सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे सालाबादप्रमाणे सातारा जिल्हास्तरीय खुल्या गटाच्या भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन दि. 16 रोजी संध्याकाळी 5 वाजता कराड उत्तर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांचे हस्ते होत आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे सुनिलराव माने जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस , राजाभाऊ जगदाळे सभापती कोरेगांव पंचायत समिती, राजाभाऊ बर्गे नगराध्यक्ष कोरेगांव नगरपंचायत , जयसिंगराव गायकवाड डायरेक्‍टर प्रतिभा हॉस्पिटल, संभाजीराव गायकवाड सरचिटणीस सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये होत आहे.

स्पर्धेची बक्षिसे प्रथम क्रमांक- 25001, द्वितीय क्रमांक -15001, तृतीय क्रमांक -11001, चतुर्थ क्रमांक – 5001 व नवचैतन्य गणराया चषक देऊन या सोहळ्यात गौरविले जाणार आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवास 26 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त विविध सांस्कृतिक तसेच क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले आहे. त्याचा परिसरातील सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)