वाठारस्टेशन येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन

वाठार स्टेशन : खो-खो स्पर्धेचे उद्घाटन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व इतर मान्यवर. (छाया : जलालखान पठाण)

वाठार स्टेशन, दि. 5 (प्रतिनिधी) – श्री वाग्देव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयच्यावतीने तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेच आयोजन करण्यात आले. खो-खो स्पर्धेचे उद्घाटन वाठार पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी केले.
वाठार स्टेशन येथील श्री वाग्देव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा भरवण्यात आल्या. या महाविद्यालयात नुकतेच आलेले मुख्याध्यापक माने यांनी पुढाकार घेऊन कोरेगाव तालुक्‍यातील 30 ते 40 शाळांना खो-खो स्पर्धेसाठी निमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले. याकामी शाळेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धा वाठार स्टेशनलाच व्हाव्यात यासाठी शाळेचे शिक्षक पाडवी यांनी संकल्प केला होता. याचे कारण असे की बरेच वर्षे झाले तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा वाठार स्टेशन येथे भरवण्यात आल्या नव्हत्या. या खो-खो स्पर्धा आजपासून तीन दिवस चालणार असून याचे संपूर्ण नियोजन श्री वाग्देव विद्यालयाचे मुख्याध्यापक माने व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांनी केले. खो-खो स्पर्धेचे उद्घाटन वाठार स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व कोल्हापूर विभागीय संघटना व सातारा जिल्हा संघटना जिल्हाध्यक्ष आर. वाय. जाधव यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास वाठार स्टेशनचे आजी- माजी सरपंच, तालुका अध्यक्ष विक्रम माने, सातारा जिल्हा रग्बी प्रशिक्षक मनोज चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, वाठार विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व मान्यवर उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)