वाठारकरांची तहान भागवण्यासाठी स्वराज्य संघटनतर्फे मोफत टॅंकर

वाठारस्टेशन : टॅंकरचे पूजन करताना मान्यवर, ग्रामस्थ व महिला. (छाया : जलालखान पठाण)

वाठार स्टेशन, दि. 19 (प्रतिनिधी) – वाठार स्टेशनला सध्या 20 ते 22 दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. गेल्या पावसाळ्यात पाऊस कमी झाल्याने वाठार स्टेशनला पाणीपुरवठा करणारी देऊर ओढ्यावरील (तळहिरा) तलाव व विहीर कोरडी पडली असल्यामुळे वाठार स्टेशन ग्रामपंचायतीने तहसीलदाराकडे प्रस्ताव पाठवून टॅंकरची मागणी केली होती. त्याअनुषंगाने तहसीलदारांनी पाहणी करून वाठार स्टेशनला टॅंकरची सोय केली आहे. परंतु, वाठार स्टेशनची लोकसंख्या अधिक असल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवतच होती. त्यामुळे वाठारकरांची तहान भागवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दिगंबर आगवणे यांनी टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. याबद्दल आगवणे यांचे ग्रामस्थांतून अभिनंदन होत आहे. टॅंकरच्या पूजनप्रसंगी वाठार स्टेशनचे माजी ग्रामपंचायत सदस्य इरफान पठाण, सुमित भोईटे, बाळू पवार, नवाज पठाण, भगवान थोरात, परशुराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)