वाजपेयी यांच्या भाषणातील काही अंश

नवी दिल्ली – अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेला त्यांचा गुण म्हणजे त्यांची भाषणे. अस्खलित हिंदी आणि काव्यमय वाक्‍यरचनेत त्यांनी केलेली भाषणे ऐकण्यासाठी श्रोते आतूर असत. शिक्षण, आण्विक चाचणीपासून काश्‍मीर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंतच्या विविध मुद्दयांवर त्यांनी केलेली भाषणे खूप गाजली होती. त्यापैकी काही गाजलेल्या भाषणांमधील काही अंश.

“शिक्षण ही संज्ञाच परिपूर्ण सत्य आहे. शिक्षण ही आत्मशोधाची एक अविरत प्रक्रिया आहे. स्वरुपाचे शिल्प साकारण्याची ही कला आहे. शिक्षणामुळे व्यक्‍ती एखाद्या कौशल्यात किंवा विद्याशाखेत पारंगत होते. पण त्याहीपेक्षा व्यक्‍तीच्या बौद्धिक, कलात्मक आणि मानवतावादी क्षमतांचा विकास होतो. शिक्षणाची आस आणि शिक्षण घेण्याची क्षमता वाढवण्याचे कामच शिक्षण करत असते. शिक्षण विषयानुरूप माहितीपुरते मर्यादित असू शकत नाही.’

28 डिसेंबर 2002 विद्यापिठ अनुदान आयोगाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभातील भाषण
—————-
“पोखरण – 2 ही अणू चाचणी केवळ स्वतःचा गौरव करण्यासाठी किंवा तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी केले गेलेले नाही. सामर्थ्य संपन्न असणे हे आमचे धोरण आहे आणि हे देशाचे धोरण आहे, असे मी समजतो. यामध्ये कमीत कमी अडथळे असायला हवेत. याचे श्रेयही मिळायला हवे. यासाठीच अणू चाचणी करण्याचा आम्ही निर्णय घेतला.’

संसदेत 1998 च्या अणू चाचणीवरील भाषण
——————————–
“तुम्ही मित्र बदलू शकता. मात्र शेजारी बदलू शकत नाहीत.’
संसदेमध्ये मे 2003 सालचे भाषण
————————-
चांगले शेजारी एकमेकांची चांगले वागावेत, अशी अपेक्षा करण्यापूर्वी या शेजाऱ्यांनी सर्वप्रथम आपल्यामधील कुंपणाच्या भिंती हटवायला हव्यात.
पेकिंग विद्यापिठात 23 जून 2003 रोजीचे भाषण
—————————-
“जर मी पक्ष फोडला आणि पुन्हा सत्तेवर येण्यासाठी नवीन आघडी केली. तर अशा सत्तेला मी साध्या टाचणी इतकाही स्पर्श करणार नाही.’
लोकसभेमध्ये 1996 साली अविश्‍वास ठरावाला उत्तर देतानाचे भाषण
———————–
संशोधन आणि प्रगतीतून मिळालेला प्रत्येक रुपया देशाच्या फायद्यासाठी खर्च होईल, याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. आपापसातील मतभेद आणि क्षुल्लक स्पर्धेत आपण सततच अडकून पडतो आहोत. त्यामुळेच आपल्या वाट्याची शांतता आपल्याला टाळून निघून जाते. इतिहासाच्या अवलोकनातून आपल्याला मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळे आपल्याला जखडून टाकता कामा नये. सामूहिक दृष्टीकोनातून आपल्याला प्रगती करावी लागेल.

जानेवारी 2004, इस्लामाबादेतील 12 व्या “सार्क’ परिषदेतील भाषण
—————————–
भारतामध्ये “शांती’ हा जीवनमंत्र आहे. शांती आणि बंधुता हा भारतीयांचा स्थायीभाव आहे. भारत कधीच आक्रमक देश, वसाहतवादी किंवा पुढारीपणा मिरवणारा देश नव्हता. आधुनिककाळातही आम्ही जगभरातील मित्रांसाठी शांतता, मैत्री आणि साकार्यासाठी योगदान देत आलो आहोत.
31 जानेवारी 2004, जागतिक शांतता आणि अहिंसा विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटनाचे भाषण
————————–
“दारिद्रय हे बहुआयामी आहे. आर्थिक उत्पन्नाच्याही पुढे शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, सर्वच स्तरातील राजकीय सहभागापासून जागतिक पातळीवरील नैसर्गिक साधन संपत्ती, स्वच्छ पाणी आणि हवेचा उपभोगापर्यंत आहे. याशिवाय संस्कृती आणि सामाजिक संघटनेतील प्रगतीतही असते.’
13 सप्टेंबर 2013. “द हिंदू’च्या 125 व्या वर्धापनदिनाचे भाषण
————————-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)