वाजपेयी यांची प्रकृती स्थीर

नवी दिल्ली – येथील एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती आता एकदम स्थीर आहे अशी माहिती रूग्णलयातून देण्यात आली आहे. मूत्र मार्गावर झालेल्या जंतुसंसर्गामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना इंजेक्‍शन वाटे अँटी बायोटिक्‍स औषधे दिली जात असून त्याला ते चांगला प्रतिसाद देत आहेत असे रूग्णालयाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

त्यांचा जंतुसंसर्ग नाहीसा होईपर्यंत त्यांना रूग्णालयात राहावे लागणार आहे. काल त्यांचे डायलेसिसही करण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आजही अनेक केंद्रीय मंत्री व राजकीय नेत्यांनी येथे हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)