वाजपेयी इच्छाशक्तीनेही अटल होते – मोदी

सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मान्यवरांकडून आदरांजली

– वंदना बर्वे

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी हे फक्त नावानेच नव्हे तर इच्छाशक्तीने सुध्दा अटल होते. विपरित परिस्थितीतही ते कधी डगमगले नाहीत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रध्दांजली वाहिली.

भारतरत्न दिवंगत वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित सर्वपक्षीय प्रार्थना सभेत पंतप्रधान बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, आरएसएसचे मोहन भागवत, योगगुरु रामदेव बाबा यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते.

मोदी म्हणाले की, आज दहशतवादाचा मुद्य जागतिक पातळीवर चर्चिला जातो तो केवळ वाजपेयी यांच्यामुळे. 1996 मधील रालोआ सरकारचा उल्लेख करीत मोद म्हणाले की, वाजपेयी यांचे सरकार 13 दिवसातच कोसळले. मात्र ते खचले नाही. निराश नाही झाले. देशाची सेवा केली आणि पुन्हा भाजपला सत्तेपर्यंत पोहचविले. आघाडीचे सरकार कसे चालविले जाते याचा धडाही त्यांच्यापासून घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. वाजपेयी यांच्या काळात झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड राज्यांची निर्मिती झाली. ती सुध्दा शांततेने. यावेळेस कुठल्याही प्रकारच्या हिंसक घटना घडल्या नाहीत. 1998 मधील अणू चाचणीमुळे आपला देश आण्विक संपन्न देश म्हणून जगासमोर आला. जागतिक दबाव असताना दोन दिवसानंतर पुन्हा चाचणी केली. इच्छाशक्ती कशास म्हणतात हे वाजपेयी यांनी दाखवून दिले, असेही मोदी यावेळी म्हणाले.

अटलजींना त्यांच्या शरीराने जोपर्यंत साथ दिली तोपर्यंत ते फक्त देशासाठीच जगले, त्यांनी सर्वसामान्यांसाठी काम केले. वाजपेयी यांनी ज्या काळात राजकारणात प्रवेश केला, त्यावेळेस राजकारणाच्या मुख्य प्रवाहाच्या आसपास इतर कोणतीही विचारधारा नव्हती. देशाचा मोठा कालखंड राजकीय अस्पृश्‍यतेचा कालखंड राहिलेला आहे. क्षणाक्षणाला अपमानित करण्याचे प्रयत्न होत असताना देखील, तसेच वेगळे विचार असताना देखील देशाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाच्या भावनेमुळे शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे असते ते त्यांनी दाखवून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)