वाजपेयीजी, तुम्ही पाकिस्तानातही निवडणूक जिंकू शकता!

नवी दिल्ली – लोकप्रियतेमुळे आणि करिष्म्यामुळे अटलबिहारी वाजपेयी भारतातील संसदीय निवडणुकांत तब्बल बारावेळा विजयी झाले. भारतातील जनतेवरच नव्हे तर पाकिस्तानी जनतेवरही त्यांनी गारूड केले. त्यातून तुम्ही पाकिस्तानातही निवडणूक जिंकू शकता, असे म्हणण्याचा मोह त्या देशाचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आवरू शकले नाहीत.

शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना वाजपेयी यांची 1999 मधील लाहोर भेट ऐतिहासिक ठरली. प्रभावी वक्तृत्वशैली असणाऱ्या वाजपेयी यांनी त्यावेळी शांततेसाठी केलेल्या आवाहनातून पाकिस्तानी जनतेचेही मन जिंकले. त्यांच्या भाषणामुळे शरीफही प्रभावित झाले. त्यातून वाजपेयीजी, अब तो आप पाकिस्तानमें भी इलेक्‍शन जीत सकते हैं, असे उद्गार शरीफ यांनी काढले.

जम्मू-काश्‍मीरमधील स्थिती सुरळीत व्हावी अशी वाजपेयींची अतिशय प्रामाणिक इच्छा होती. पंतप्रधान या नात्याने त्यांनी काश्‍मीर खोऱ्याला दिलेल्या पहिल्या भेटीतूनही काश्‍मिरी जनतेची मने जिंकली. आम्हाला काश्‍मीर खोऱ्यात शांतता हवी आहे. तुमचे सर्व प्रश्‍न जम्हुरियत, इन्सानियत आणि काश्‍मिरीयत या भावनेतून सोडवण्याची आमची इच्छा आहे, अशी साद त्यावेळी त्यांनी तेथील जनतेला घातली.

वाजपेयींनी दिलेला तो मंत्र आजही महत्वाचा मानला जात आहे. त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात त्या मंत्राचा उल्लेख केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)