वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केल्याने MIM नगरसेवकाला बेदम चोप

औरंगाबाद – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला भाजप नगरसेवकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार औरंगाबाद महापालिकेत घडला. भाजप नगरसेवकांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना बेदम चोप दिला.

औरंगाबाद महानगरपालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. या सभेला एमआयएमच्या नगरसेवकाने विरोध केल्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांना मारहाण केली. ही घटना आज शुक्रवारी दुपारी विशेष सभेत घडली.

भाजपा नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्‌यांनी तुडवत बेदम मारहाण केली. त्यानंतर सय्यद मतीन यांना कायमस्वरूपी निलंबन करावे अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी केली आहे.

यासर्व प्रकरणानंतर एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर औताडे, प्रमोद राठोड यांनी पोलीस आयुक्त प्रसाद यांची भेट घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)