वाजपेयींच्या मासिक पुण्यतिथीनिमित्त “काव्यांजली’

नवी दिल्ली – दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मासिक पुण्यतिथीनिमित्त 16 सप्टेंबर रोजी देशभरात भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी काव्यांजलीचा प्रमुख कार्यक्रम होणार आहे. दिल्लीतील मुख्यालयात पत्रकार परिषदेत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी ही माहिती दिली.

शाह म्हणाले, 16 सप्टेंबर रोजी देशभरातील 4 हजार जागी हा काव्यांजलीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी लिहीलेल्या कविता त्यांच्या आवाजातील रेकॉर्डिंग ऐकवण्यात येणार आहे. यामध्ये विविध कवी अटलजींच्या कवितांचे म्हणतील तसेच त्यांनी अटलजींवर केलेल्या कवितांचे सादरीकरण होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. हा दिवस “सेवा दिवस’ म्हणून साजरा करतात. मात्र, यावेळी 17 ते 25 सप्टेंबर (दीन दयाल जयंती) पर्यंत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. वाजपेयींसाठी ही कार्याजंली असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)