वाजपेयींच्या निधनाची बातमी उशीरा जाहीर केली?

शिवसेनेच्या मुखपत्रात व्यक्त केला गेला संशय

मुंबई – माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाची बातमी उशीरा प्रसिद्ध केली असावी, अशी शंकायुक्‍त आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातील एका लेखाद्वारे केला आहे. वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्टला झाले, यावर त्यांनी शंका उपस्थित केली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून वाजपेयी यांच्या निधनाची बातमी उशीरा प्रसिद्ध केली गेली असावी, अशी शंका त्यांनी बोलून दाखवली आहे. मात्र “एम्स’कडून वाजपेयी यांच्या मृत्यूची तारीख 16 ऑगस्ट का जाहीर केली गेली, याबाबत राऊत यांनी स्पष्टीकरण दिले नाही.

वाजपेयी यांची प्रकृती 12-13 ऑगस्टपासूनच खालावली होती. मात्र राष्ट्रीय दुखवटा आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याची नामुष्की टाळण्यासाठी तसेच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात व्यत्यय येऊ नये यासाठी वाजपेयी यांच्या मृत्यूची बातमी 16 ऑगस्टला जाहीर केली गेली, असे राऊत म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)