वाचा : रवी शास्त्री आणि निमरतची प्रेमकहाणी

भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक रवी शास्त्री पुन्हा एकदा बॉलिवूड अॅक्‍ट्रेसबरोबरच्या अफेअरमुळे चर्चेत आला आहे. यावेळी “एअरलिफ्ट’ची नायिका निमरत कौर ही शास्त्रीबुवांची हिरोईन आहे. तिकडे इंग्लंडमध्ये टीम इंडिया सपाटून मार खात असताना प्रशिक्षक शास्त्रीबुवा आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान हिरोईनबरोबर डेटिंगमध्ये रमले असल्याच्या बातम्या खूप व्हायरल व्हायला लागल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शास्त्री आणि निमरत कौर लपून-छपून डेटिंग करत आहेत, अशी बातमी दोनच दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही.

या सगळ्या प्रकारावर निमरतने तातडीने एक मजेदार स्पष्टीकरण दिले आहे. “मला रूट कॅनोल करायचे आहे हे खरे आहे, पण माझ्याबद्दल आज जे काही वाचायला मिळते आहे, ते निव्वळ काल्पनिक आहे. एवढेच नाही, तर ते सर्व त्रासदायकही आहे.’ असे तिने म्हटले आहे. प्रकरण एवढ्यावरच थांबले असते तरी चालले असते. पण शास्त्रीबुवांनाही आपल्याशी संबंधित या विषयावर काही तरी मतप्रदर्शन करण्याची हुक्की आली.

अशा अफवा पसरवणाऱ्या बातम्या या शेणासारख्याच घाणेरड्या असतात. हे सगळे बकवास आहे. माझ्यात आणि निमरत कौरमध्ये असे काहीही नाही, असे शास्त्रीबुवांनी म्हटले आहे. पण यामुळे संशय अधिकच वाढला आहे.

रवी शास्त्री आणि निमरत कौर 2015 मध्ये एका जर्मन लक्‍झरी कारच्या लॉंचिंगच्या वेळी भेटले होते. हे दोघेही एकच ब्रॅन्डचे प्रमोशन करत आहेत. त्यामुळे कामाच्या निमित्ताने ते सारखे भेटत असावेत. म्हणूनच त्यांच्यात खास बॉन्ड निर्माण झाला असावा. तेव्हापासून त्यांची खास दोस्ती आहे, पण त्यांनी हे रिलेशन कधी उघड होऊ दिले नव्हते.

रवी शास्त्रीचे नाव यापूर्वी सैफ अलीची पूर्वीची पत्नी अमृता सिंगबरोबर जोडले जात होते. त्यानंतर शास्त्रीबुवांचे लग्न 1990 साली रितू सिंगबरोबर झाले. मात्र, 22 वर्षांच्या संसारानंतर 2012 मध्ये ते दोघे विभक्‍त झाले. रवी शास्त्रीला एक मुलगीही आहे. तर दुसरीकडे निमरत कौर अजूनही सिंगलच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)